Posts

Showing posts from August, 2022

अत्यावश्यक माहिती

 *शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या फायद्याचे.*     प्रत्येक शिक्षकांने गुगल ड्राईव्हवर कायमस्वरुपी जतन करून ठेवावी अशी पोस्ट आहे. दरवर्षी पहिलीला नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना, अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षक नव्याने मूळाक्षरे शिकवतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना मुळाक्षरे लिहिण्यात व वाचण्यात अडचण येते. मुळाक्षरे कशी लिहायची कशी वाचायची यासाठी शिक्षक विविध उपक्रम राबवत असतात.        ज्या विद्यार्थ्यांना लेखन व वाचन येते त्या विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी शिक्षकबांधव नेहमीच प्रयत्नशील असतात, यामध्ये काही वेळा यश येते तर काही वेळा यश येत नाही. या पोस्टमध्ये प्रत्येक मूळाक्षर शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे लिहायचे त्याचे वाचन उच्चार अगदी सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिकासह दाखवलेला आहे. रोज एक मुळाक्षर लिहीण्याचा व वाचण्याचा विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतला तर त्याच्या लेखन व वाचनात तर सुधारणा होते सोबतच हस्ताक्षर सुद्धा १००%  सुधारते याची खात्री आहे. हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.  रोज एक मुळाक्षराची लिंक संबंधित विद्यार्थ्य...